loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गासाठी अंत्ययात्रा आंदोलनाला सुरुवात

खेड (दिलीप देवळेकर) : राष्ट्रीय महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीने ६ डिसेंबर ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत महामार्गाच्या पूर्णत्वासाठी पुन्हा एकदा जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाला लोणेरे (ता. माणगाव, जि. रायगड) येथून सुरुवात होणार असून आंदोलनाची समाप्ती ११ जानेवारी रोजी संगमेश्वर येथे रास्ता रोको आंदोलनाने होणार आहे. गेल्या १७ वर्षांपासून महामार्गाचे काम रखडले असून अद्याप सुरक्षितपणे वाहतुकीस खुला झालेला नाही. आता जनआक्रोश समितीच्या माध्यमातून संबंधित ठेकेदार व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व कोकणवासीयांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

६ ते ७ डिसेंबर रोजी सकाळपासून लोणेरे ते कोलेटी येथे अंत्ययात्रा आंदोलन होणार आहे. त्यानंतर १३ ते १४ डिसेंबर रोजी खेड ते चिपळूण, २७ व २८ डिसेंबर रोजी लांजा ते हातखंबा, ३ व ४ जानेवारी रोजी हातखंबा ते संगमेश्वर व १० आणि ११ जानेवारी रोजी सावर्डे ते संगमेश्वर येथे आंदोलन तसेच रास्ता रोको असे या आंदोलनाचे नियोजन आहे. यावेळी कोकणवासीयांच्या माध्यमातून समितीतर्फे शासनाकडे प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे, निवेदनामध्ये स्वतंत्र उच्चस्तरीय तटस्थ समिती नेमून महामार्गाचे पारदर्शक व प्रभावी तर तटस्थपणे परीक्षण करावे. यामध्ये जनआक्रोश समितीचे चार सदस्य सामावून घ्यावेत, अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी. यामध्ये अर्धवट काम, विलंब आणि निष्काळजीपणास जबाबदार असणारे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई करावी. महामार्गाच्या कामासाठी निश्चित व अंतिम मुदतीमध्ये स्पष्ट व अंतिम मुदत जाहीर करून त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे व प्रत्यक्षात दर आठवड्याला पाहणी करून प्रगतीचा अहवाल द्यावा, नागरिकांच्या सुरक्षेसाठी नियोजन करावे, अर्धवट भागातील कामांवर तातडीने योग्य सूचनांचे फलक, महामार्गाची सद्यस्थिती, अडचणी व खर्च, विलंबाची कारणे, जबाबदार घटक आदींचा सविस्तर आणि सार्वजनिक अहवाल तातडीने जाहीर करावा, बाधित अपघातग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, मृतांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई मिळावी.

टाइम्स स्पेशल

गेली १७ वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. दरवर्षी हे काम पूर्ण होण्यासाठी नवीन तारीख आणि नवीन डेडलाईन जाहीर केली जाते; मात्र कामाची प्रगती न होता अजूनही महत्त्वाच्या परिसरातील कामे रेंगाळली आहेत. परिणामी वाहतूक कोंडीसह अपघात, त्यातून होणारे मृत्यू यांची मालिका आजपर्यंत सुरूच आहे. आजवर सुमारे ४ हजार ५०० नागरिकांना अपघातामध्ये जीव गमवावा लागला आहे, तर हजारोंच्या संख्येने प्रवासी जखमी झाले आहेत. महामार्गावर कायमस्वरूपी चोवीस तास ट्रामा केअर सेंटर उभारावे, स्थानिक जातीच्या वृक्षांचे रोपण करावे, महामार्गावर बाधित झालेल्या झाडांची भरपाई म्हणून तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण करावे, आदी प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. त्या त्या ठिकाणच्या नागरिकांनी आपल्या भागातील आंदोलनात सहभागी होऊन शासनाला जाब विचारावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg