loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांची अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

​रत्नागिरी : ​कोकण रेल्वे मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. प्रवाशी गाढ झोपेत असताना रात्रीच्या वेळी होणाऱ्या या चोऱ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, या घटनांचा छडा लावण्यात रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांना मोठे यश आले आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या काळात दाखल झालेल्या आठ चोरीच्या प्रकरणांचा तपास करून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापूर्वी रेल्वे मार्गावरील चोऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे रत्नागिरी पोलिसांना कठीण होत होते. या समस्येवर उपाय म्हणून रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर स्वतंत्र लोहमार्ग पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आले आहे. या नव्या युनिटने तात्काळ कामाला सुरुवात करत वाढत्या चोरीच्या घटनांचा तपास हाती घेतला. ​अगदी कमी वेळेत लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रेल्वेत झालेल्या चोरीच्या आठ तक्रारी रत्नागिरी लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. या तक्रारींचा कसून तपास करत पोलिसांनी एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. ​ चोरीला गेलेला अंदाजे ५ लाख रुपयांपर्यंतचा मुद्देमाल पोलिसांनी यशस्वीरित्या हस्तगत केला आहे.

टाइम्स स्पेशल

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान, या चोरीच्या कटात आरोपीचे तीन साथीदार देखील सहभागी असल्याचे उघड झाले आहे. हे तीनही आरोपी सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. ​लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमुळे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आता प्रभावीपणे चाप बसणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg