loader
Breaking News
Breaking News
Foto

निलेश लांजेकर यांची वैद्यकीय मदत कक्ष गुहागर तालुका अध्यक्ष पदावर निवड

वरवेली (गणेश किर्वे) - निर्मल फाउंडेशन संचलित संतोषदादा जैतापकर वैद्यकीय मदत कक्षचे संस्थापक संतोष लक्ष्मण जैतापकर यांच्या मान्यतेने जानवळे गावचे सामाजिक कार्यकर्ते निलेश लांजेकर यांची संतोषदादा जैतापकर वैद्यकीय मदत कक्ष गुहागर तालुकाअध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जानवळे गावचे सामाजिक कार्यकर्ते निलेश लांजेकर हे नेहमी सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असून विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. शृंगारतळी परिसरामध्ये एखादा अपघात घडल्यास त्याला प्रथमोपचार तसेच पुढील उपचारासाठी नेण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. संतोषदादा जैतापकर वैद्यकीय मदत कक्ष माध्यमातून त्यांनी अनेक गरीब व गरजू रुग्णांसाठी मदत केली आहे. उपजिल्हा रुग्णालय कामथे, जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी तसेच इतर रुग्णालयामध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क असल्यामुळे गुहागर तालुक्यातील गोरगरीब जनतेला त्यांचा नेहमी आधार असतो. परंतु त्यांनी कधीही केलेल्या वैद्यकीय मदतीच्या सेवेची प्रसिद्धी करून घेतले नाही. त्यांच्या अनमोल अशा कार्याबद्दल त्यांना वैद्यकीय मदत कक्ष गुहागर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वच पक्षातील तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचे अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg