loader
Breaking News
Breaking News
Foto

आज शुक्रवारी रत्नागिरीच्या श्रीराम मंदिरात श्री देवी तुळजाभवानीचा खानदानी गोंधळ

रत्नागिरी - येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराचे प्रांगणातील श्री देवी तुळजाभवानी देवस्थान येथे आज शुक्र. दि. 12 डिसें. 2025 रोजी ‘श्री देवी भवानीचा गोंधळ’ आयोजित करण्यात आला आहे. या देवस्थानातील गोंधळाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सर्व भगिनींना हाती मशाल घेऊन ‘अंबे उदे उदे’च्या जयघोषात गोंधळाच्या मांडाभोवती फेर धरण्याची संधी देण्यात येते. रत्नागिरीतील श्री देवी तुळजाभवानीचे देवस्थान हे एक जाज्वल्य देवस्थान म्हणून सुपरिचीत आहे. या देवस्थानची अनुभूती आल्याचे तसेच केलेला ‘नवस’ पावन झाल्याचे अनेक भाविक आवर्जून सांगतात. या श्रीराम मंदिराचे प्रांगणातील श्री देवी तुळजाभवानी, श्री देव विठ्ठल रखुमाई व श्री देव दत्तगुरु या देवस्थानांच्या वर्धापन दिनानिमित्त सालाबादप्रमाणे हा गोंधळ आयोजित करण्यात आला आहे. हा ‘देवी भवानीचा गोंधळ’ श्रीराम मंदिर, रत्नागिरी येथे शुक्र. दि. 12 डिसें. रोजी सायं. 4 वा. पासून सुरु होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या देवी भवानीच्या गोंधळाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- 1) दु. 1 ते 2.30 पर्यंत देवी भवानीच्या गोंधळाचा ‘पारंपारिक’ महाप्रसाद 2) दु. 3 वा.- कुमारिका पूजन व सुहासिनींची ओटी भरणे 3) सायं. 4 वा. - जोगवा कार्यक्रम 4) सायं. 4.30 वा.- गोंधळाचा मांड मांडण्यास प्रारंभ 5) सायं. 5 वा.- मांडाची पूजा, 6) सायं. 5.30 वा. पासून हाती मशाल घेऊन मांडाभोवती ‘जय अंबे उदे उदे’ च्या जयघोषात फेर धरण्यास प्रारंभ. 7) सायं. 7.30 वा.- भाविकांचे नवस करणे व पावन झालेले नवस मानवणे. 8) रात्रौ 8 ते 10 वा.- गोंधळाचे उत्कंठावर्धक कथानक. यावेळी सर्व उपस्थित महिलांना सर्वप्रथम हाती दिवटी घेऊन मांडाभोवती फेर धरण्याची संधी देण्यात येईल. सर्व उपस्थित महिलांना ही संधी देण्यात आल्यानंतर उपस्थित भाविक हाती दिवटी घेऊन मांडाभोवती फेर धरतील. त्यानंतर ज्या भाविकांना नवीन नवस करायचे असतील त्यांचे गोंधळाच्या मांडासमोर व देवी तुळजाभवानी समोर नवस केले जातील, तसेच ‘पावन’ झालेले नवस मानवले जातील.

टाइम्स स्पेशल

यावेळी सर्व उपस्थित भाविकांना देवस्थानतर्फे मटार उपमाचा महाप्रसाद देण्यात येईल. नंतर गोंधळी मंडळी त्यांचे उत्कंठावर्धक कथानक सुरु करतील. गोंधळाचे कथानक ऐकण्यास सर्व लहानथोर मंडळी तल्लीन होऊन जातात. रत्नागिरी व परिसरातील भाविकांना हे रोमहर्षक कनाथक ऐकण्याची संधी लाभेल. या भवानीच्या गोंधळाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हा प्रत्यक्ष देवी तुळजाभवानीचा गोंधळ असल्याने तो पूर्णत: पारंपारिक व शतकानुशतकांच्या रिवाजानुसार संपन्न होईल. हा गोंधळाचा कार्यक्रम सर्वांना खुला आहे. रत्नागिरी व जिल्ह्यातील भाविकांनी व बंधू भगिनींनी या गोंधळाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे व प्रत्यक्ष देवी भवानीचा गोंधळ अनुभवण्याची संधी घ्यावी तसेच श्री देवी तुळजाभवानीचे दर्शन व महाप्रसाद याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg