loader
Breaking News
Breaking News
Foto

आदर्श हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कर्जीमध्ये फूड फेस्टिवल उत्साहात साजरा

संगलट (खेड)( इक्बाल जमादार) - खेड तालुकीयातील कर्जी तालिमी अंजुमन कर्जी संचलित आदर्श हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कर्जी व आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल कर्जी येथे शनिवार दि.13 डिसेंबर 2025 रोजी फूड फेस्टिवल उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला दोन्ही प्रशालेच्या मुख्याध्यापिका, विद्यार्थी, शिक्षक तसेच संस्थेचे सेक्रेटरी फैयाज परकार, स्कुल कमिटी अध्यक्ष अखलाक परकार, माजी विद्यार्थी व दानशूर व्यक्ती अमीर हमदुले, मुखतार सुर्वे, अशरफ तांबे, आबिदा हमदुले, मुमताज सुर्वे व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाची सुरवात विद्यार्थीनी अजिजा परकार हिच्या तिलावतीने झाली. त्यानंतर सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्कूल कमिटी अध्यक्ष अकलाख परकार यांनी आपल्या भाषणामध्ये या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर रजवेलचे एक दानशूर व्यक्ती आमिर हमदुले यांच्या हस्ते त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या टेबल टेनिस चे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आता आणखीन क्रीडा साहित्य म्हणून क्रिकेटच्या चार बॅट व बॉल व तसेच यापुढेही शाळेतील विद्यार्थ्यांना लागणारे क्रीडा साहित्य पुरवण्यासाठी मदत करू असे आश्वासन दिले. यानंतर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पदार्थांचे परीक्षण करण्यात आले. सदर परीक्षणाचे काम करण्यासाठी परीक्षक म्हणून मुमताज बशीर सुर्वे व आबिदा हमदुले यांनी काम पाहिले. फूड फेस्टिवल मध्ये शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने सहभाग घेतला होता व आपला पदार्थ जास्तीत जास्त रुचकर कसा होईल व त्याची विक्री कशी जास्त होईल याची सर्व खबरदारी घेतली होती.

टाइम्स स्पेशल

सदर कार्यक्रमाला कर्जी पंचक्रोशीतील लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आणलेल्या पदार्थांवर त्यांनी यथेच्छ ताव मारला. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख राबिया कादरी व अनम कादरी यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg