loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणच्या साक्षी जडयाळने विक्रमी वेळ नोंदवत आंतराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकली

चिपळूण - पुणे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील कुडप येथील साक्षी संजय जड्याळ या धावपटूने इथिओपियन धावपटूंना मागे टाकून संस्मरणीय यश मिळवले आहे. विशेष म्हणजे साक्षी प्रथमच फुल मॅरेथॉनमध्ये (४२.१९५ कि. मी.) सहभागी झाली आणि जिंकलीही! तिच्या या यशाने चिपळूण तालुक्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव झळकले आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एरवी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हटले, की आफ्रिकन धावपटूंचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र, महिलांच्या मॅरेथॉनमध्ये या वर्चस्वाला रविवारी धक्का बसला. महाराष्ट्राच्याच चिपळूण तालुक्यातील कुडप येथील साक्षी संजय जड्याळने इथिओपियन धावपटूंना मागे टाकून संस्मरणीय यश मिळवले आहे. सणस क्रीडांगणापासून रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता मॅरेथॉनला प्रारंभ झाला. गेल्या वर्षी साक्षीने पुणे मॅरेथॉनमधील अर्धमॅरेथॉन जिंकली होती. या वेळी ती जिद्दीने ४२.१९५ किमी अंतराच्या शर्यतीत सहभागी झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासाठी तिने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सातार्‍यात कसून सराव केला होता. या मेहनतीचे रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी चीज झाले. जिंकण्याच्या जिद्दीनेच साक्षी मॅरेथॉनसाठी आली होती. तिने पूर्ण जोर लावला आणि पाहता पाहता या शर्यतीत बाजीही मारली. साक्षीने २ तास ३९ मिनिटे ’व ३७ सेकंद अशी वेळ नोंदवली. विशेष म्हणजे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये गेल्या काही वर्षांत महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमधील भारतीय धावपटूने नोंदवलेली ही सर्वोत्तम वेळ ठरली. इथिओपियाची एडाओ मेसेरेट तुलू २ तास ४० मिनिटे व ५६ सेकंद वेळ नोंदवून दुसर्‍या, तर बोंटू डेमिसे २ तास ५० मि. ४६ सेकंद वेळेसह तिसर्‍या स्थानी राहिली. २१ वर्षीय साक्षी मुळची चिपळूण तालुक्यातील कुडप गावची. तिने सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम शाळेत शिक्षण घेतले आहे. अनेक अडचणींना तोंड देत खेळात विषेश प्रगती केली. डेरवण येथे तिने क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांच्या सहकार्याने नवरत्न अकॅडमीमध्ये अविनाश पवार अ‍ॅथलेटिक्स राष्ट्रीय खेळाडू आणि कोच यांचेकडे धडे घेतले. क्रीडा शिक्षक उदयराज कळंबे यांचे देखील तिला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. सातार्‍यात समाधान पुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षापासून सराव करत आहे. ती उल्हासनगरच्या मुंबई-एसएससीटी कॉलेजमध्ये बीएच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg