loader
Breaking News
Breaking News
Foto

बॅ. नाथ पै सेवांगणचा मधु वालावलकर समाजसेवक पुरस्कार विद्याधर चिंदरकर यांना प्रदान

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने देण्यात येणारा कै. मधु वालावलकर समाजसेवक पुरस्कार मालवण तालुक्यातील वराड भंडारवाडी येथील रहिवासी समाजसेवक विद्याधर चिंदरकर यांना वराड भंडारवाडी येथील महापुरुष मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम ५ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप होते. विद्याधर चिंदरकर हे वराड गावासह कट्टा पंचक्रोशीत समाजसेवी व्यक्ती म्हणून परिचित आहेत. त्यामुळे बॅ. नाथ पै सेवांगणचा मधु वालावलकर समाजसेवक पुरस्कार त्यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विकास म्हाडगुत यानी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बॅ. नाथ पै सेवांगणचे दीपक भोगटे यांनी केले. किशोर शिरोडकर सन्मानपत्र वाचन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सरपंच शलाका रावले म्हणाल्या, आमच्या गावात निस्वार्थी भावनेने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून चिंदरकर यांची ओळख आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आमच्या गावाचा सन्मान असून आमच्या गावच्या अभिमानात या सन्मानाने आपण भर टाकली आहे, असे सांगितले. यावेळी इतिहास संशोधक डॉ. ज्योती तोरसकर यांनी माणसाच्या रूपात मदतीला धावून येणारा व्यक्ती म्हणजेच देव असतो. तो चिंदरकर यांच्या सारख्या रूपाने मदतीला धावून येत असतो, अशा शब्दात कौतुक केले. प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत समाजसेवा करणारा विद्या दादा असावा, कारण असा एक विद्या विचारांनी तयार झाला तर समाज सुधारण्यास वेळ लागणार नाही, असे सांगितले. यावेळी मधू सावंत, बाळू वराडकर, दत्तात्रय टेमकर,बबन पांचाळ, सुनील नाईक, श्वेता तेंडुलकर, वराड शाळा मुख्याध्यापिका मयेकर, आनंद धुत्रे यांनीही मनोगते व्यक्त केली.

टाइम्स स्पेशल

यावेळी वराड गावातील वयोवृद्धांचा सेवांगणाच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ॲड. प्रदीप मिठबावकर यानी केले. यावेळी कार्यक्रमास लक्ष्मीकांत खोबरेकर, राजा खांडाळेकर, अर्चना धुत्रे, पत्रकार विशाल वाईरकर, अण्णा मोरजकर, रामचंद्र आंबेरकर, शरद मोरजकर, रवी परब, सिताराम मिठबांवकर, प्रवीण मिठबावकर , वैजयंती वराडकर, हरी परब, टिकम मॅडम, गौरांगी वराडकर, प्रमोद सारंग, गजा परब, अशोक पराडकर, बाळा वराडकर, विनोद आळवे, सुभाष मांजरेकर, सुरेश कांबळी, राजन माणगावकर, शोभा म्हाडगुत, दादा चिंदरकर, राजीव म्हाडगुत, निलेश हडकर, गिरीश आळवे वराड गावातील अनेक ग्रामस्थ, कट्टा बाजारपेठ व परिसरातील ग्रामस्थ सेवांगणचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg