loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची दिवस जवळ येताहेत तशी उत्कंठा वाढतेय

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची तारीख जसजसी जवळ येऊ लागली असल्याने उमेदवारांची धाकधुक वाढली असून निकाला दिवशी कोणाच्या नशिबाला लॉटरी लागणार? याचीच उत्कंठा शिगेला पोहचली आहे. लांजा नगरपंचायत निवडणूक चुरशीची आणि अटीतटीची झाली. निकालाकडे सर्वाचे अधिक लक्ष वेधले आहे. लांजा नगरपंचायत निवडणुक सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रतिष्ठेची केली. नगराध्यक्ष पदाची निवडणूक तिरंगी तगडी लढत झाली. कोण बाजी मारणार? याचीच चर्चा केली जात असून तर्कवितर्क लढविले जात आहेत. निकालाचे दिवस जवळ येऊ लागल्याने ह्दयाची धडधड वाढू लागल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या निवडणुकीत १७ प्रभागासाठी एकूण ६० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. लांजा नगरपंचायतीवर शिवसेना, महाविकास आघाडी की लांजा कुवे संघटन अपक्ष यापैकी कोणाचे वर्चस्व रहाणार याविषयी उत्सुकता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg