loader
Breaking News
Breaking News
Foto

सारळ येथे पिंपळे बंधू निवासस्थानी दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा

अलिबाग (वार्ताहर)- अलिबाग तालुक्यातील सारळ येथे पिंपळे बंधू यांच्या निवासस्थानी गेल्या 37 वर्षापासून दत्तजयंती सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होतो. होमहवन, पालखी मिरवणूक, भजन, किर्तन व इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षीही हा दत्तजयंती सोहळा पिंपळे बंधू यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. विशेष म्हणजे खासदार सुनील तटकरे, अलिबाग-मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक, पोलीस उपयोगी अधिकारी सौ. मोरे, मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्री. हांडे, वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. साळे, तहसीलदार विक्रम पाटील, भाजपाचे अलिबाग तालुका अध्यक्ष अ‍ॅड.अंकित बंगेरा, अ‍ॅड.वैशाली बंगेरा, रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व इतर अधिकारी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. पिंपळे बंधू यांच्या निवासस्थानी दत्तजयंती सोहळ्यानिमित्त प्रथमच पार्थिव शिवलिंगाची भस्मारती करण्यात आली. आचार्य राहुल पिंपळे यांनी दोन दिवस दत्त रुद्र याग आयोजित केला होता. या यागात खासदार सुनील तटकरे व सौ.वरदा तटकरे यांनी उपस्थिती दर्शवली. माजी आमदार अनिकेत तटकरे, सौ. स्नेहा तटकरे, यांनीही या सोहळ्याला उपस्थितीत दर्शवून दत्त रुद्र यागाचे यथासांग पूजन केले. आचार्य राहुल पिंपळे यांच्यासोबत वेदाचार्य भावीन त्रिवेदी यांनी या सोहळ्यात धार्मिक विधी पार पाडले. दरवर्षी दत्तजयंती सोहळ्यानिमित्त पिंपळे बंधू यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg