loader
Breaking News
Breaking News
Foto

सचिन मर्गज मृत्यू प्रकरण: घातपाताचा संशय, सखोल चौकशीसाठी ग्रामस्थांचे सावंतवाडी पोलिसांना निवेदन

सावंतवाडी: वेर्ले (ता. सावंतवाडी) येथील सचिन मर्गज यांच्या बंदुकीची गोळी लागून झालेल्या मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. या मृत्यूमागे केवळ अटक करण्यात आलेला सिप्रियान डान्टस हा एकटाच नसून, आणखी काही जणांचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप वेर्ले ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, या मागणीसाठी माजी सरपंच पंढरी राऊळ यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सचिनच्या मृत्यूमागे डान्टससह अन्य संशयितांचाही हात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. वेर्ले, शिरशिंगे, कलंबिस्त, ओवळीये आणि सांगेली या सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये बाहेरील शिकारी लोक स्थानिक तरुणांना हाताशी धरून अनैतिक प्रकार करतात. या प्रकारांची तातडीने चौकशी व्हावी. या प्रकरणात राजकीय दबाव वापरला जात असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला असून, सखोल तपासाची मागणी केली आहे. पोलीस निरीक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक माहिती देण्यासाठी तातडीने पत्रकार परिषद घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. "सचिन हा शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने मर्गज कुटुंबाचा आधार हरवला आहे. जर या प्रकरणी योग्य न्याय मिळाला नाही, तर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल." असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे निवेदन सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना सादर करताना माजी सरपंच पंढरी राऊळ यांच्यासोबत बाळू गावडे, विजय राऊळ, चंद्रकांत राणे, सदाशिव कदम आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg