loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशीत पुन्हा चिकन सेंटरसह गॅरेज फोडले; २० कोंबड्यांसह चिल्लर लंपास

भेडशी (प्रतिनिधी) : दोडामार्ग शहरात ५ दुकाने फोडल्याची शाई वाळते तोच, काल रात्री साटेली-भेडशीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. खालच्या बाजारातील अशोक गुरव यांचे गॅरेज आणि करुणा सदन समोरील जाफर यांचे चिकन सेंटर अशी दोन दुकाने एकाच रात्री फोडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, चिकन सेंटरचे पत्रे उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे समोर आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काल रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी करुणा सदन शाळेसमोरील जाफर यांच्या चिकन सेंटरला लक्ष्य केले. दुकानाच्या संरक्षणासाठी लावलेले पत्रे वाकवून आणि उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश मिळवला. या दुकानातून चोरट्यांनी २० कोंबड्या, कापण्यासाठी वापरली जाणारी सुरी आणि गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली. दुकानाची स्थिती पाहता हे काम स्थानिक आणि माहितीगार भुरट्या चोरांचे असावे, असा संशय बळावला आहे. तसेच, खालच्या बाजारातील गुरव यांच्या गॅरेजवरही याच रात्री डल्ला मारण्यात आला. तिथे चोरट्यांच्या हाती मोठी रक्कम लागली नाही, मात्र चिल्लर चोरून नेण्यात आली.

टाइम्स स्पेशल

एकाच रात्रीत, एकाच पद्धतीचा वापर करून दोन-दोन दुकाने फोडली जात आहेत. दोडामार्ग आणि साटेली-भेडशीत सलग दोन रात्री चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने व्यापारी दहशतीखाली आहेत. पोलिसांनी तातडीने रात्र गस्त वाढवून या स्थानिक टोळक्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg