loader
Breaking News
Breaking News
Foto

एसटीतर्फे कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट दर्शनयात्रा

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व मालवण आगार, एसटीप्रेमी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणहून कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट दर्शनयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत मालवण-आदमापूर बाळूमामा दर्शन, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर दर्शन, ज्योतिबा दर्शन, तुळशीवाडी दत्त दर्शन, पंढरपूर विठ्ठल दर्शन (मुक्काम) अक्कलकोट दर्शन, मालवण असा प्रवास होणार आहे. प्रवास भाडे प्रौढांसाठी १९०७ रुपये, तर मुले / महिला / ज्येष्ठ नागरिकांसाठी ९६१ रुपये ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास पूर्णतः मोफत असेल. (जेवण व निवासाचा खर्च स्वतंत्र.)

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यात्रेसाठी ४० प्रवासी उपलब्ध झाल्यानंतर बससेवा आपल्या गावातून उपलब्ध होणार असल्याचे आगार प्रशासनाने सांगितले. अधिक माहिती व बूकिंगसाठी संपर्क आगार व्यवस्थापक अनिकेत सूर्यवंशी-८२७५०२५४०६, स्थानकप्रमुख स्वप्नील गजरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सतीश वाडके, लिपीक दिलीप हिंदळेकर, प्रवासीमित्र अनंत सामंत यांच्याशी संपर्क साधावा. भाविकांनी लवकर नोंदणी करून यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg