loader
Breaking News
Breaking News
Foto

कास शाळा क्र. 1 ला अमेरिकेहून एचपी प्रिंटरची भेट

बांदा (प्रतिनिधी) - अमेरिकास्थित असलेले कास गावचे सुपुत्र सुनील भालचंद्र पंडित व संगीता पंडित यांनी गावातील शाळा क्र. 1 ला अत्याधुनिक एचपी प्रिंटर भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक कार्याला महत्त्वाची चालना दिली आहे. शिक्षण प्रक्रियेत आवश्यक असलेली छपाई, शैक्षणिक साहित्य निर्मिती व विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धात्मक उपक्रमांसाठी हा प्रिंटर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सामाजिक योगदानाबद्दल शाळेतर्फे सुनील व संगीता पंडित यांचे आभार मानण्यात आले. या उपक्रमात त्यांचे भाऊ नंदकुमार पंडित यांनीही मोलाचे सहकार्य दिल्याने त्यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. सरपंच प्रवीण पंडित यांनी या तिघांचे कौतुक करत, गावातील शैक्षणिक प्रगतीसाठी पंडित कुटुंबाचे योगदान आदर्शवत आहे, असे प्रतिपादन केले. या प्रसंगी कास विकास मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पंडित, सचिव नंदकुमार पंडित, प्रकाश पंडित, अर्जुन कासकर, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg