loader
Breaking News
Breaking News
Foto

वाडी जैतापूर गावात बिबट्याची दहशत

खेड : खेड तालुक्यातील वाडी जैतापूर, मांडवे, महिपतगड, सुमारगड परिसरात बिबट्याने उच्छाद घातला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. काल मध्यरात्री वाडी जैतापूर गावचे पोलीस पाटील बाळकृष्ण कासार यांच्या घरातील अंगणातून बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून ठार मारून जंगलात घेऊन गेला. त्याचप्रमाणे सुमारगड येथील ग्रामस्थ, तुळशीराम शिंदे यांची गाय, धनगरवाडी ग्रामस्थ लक्ष्मण जानकर यांची एक गाय, पांडुरंग जानकर यांची गाय, वाडी बेलदार येथील ग्रामस्थ बाबा भंडारे यांच्या ५ शेळ्या नुकत्याच ठार मारल्या होत्या. आता तर बिबट्याचा वावर लोक वस्तीमध्ये वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाल आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शेतकरी आणि महिला शेतीच्या कामाला सुद्धा जाण्यासाठी घाबरत आहेत. वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दिवसा ढवळ्या गावाच्या आजूबाजूला बिबट्या गर्जना (भुरकत) असल्याने नळपाणी योजनेचे पाणी सोडायला भीती झाली आहे. एक मोठी मादी बिबट्या असून तिची २ मोठी पिल्ले असल्याचे निदर्शनात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg