loader
Breaking News
Breaking News
Foto

अग्निवीर स्वप्नोज ‘आबू’ म्हात्रेच्या आगमनाने गावात अभिमानाचे वादळ

उरण (वार्ताहर)-सारडे गाव आज अक्षरशः अभिमानाने फुलून गेलं. माजी सरपंच शशिकांत अंबु म्हात्रे यांचा सुपुत्र स्वप्नोज संगीता शशिकांत म्हात्रे (आबू) हा भारतीय अग्निवीर सैन्य दलाचे हैद्राबाद येथे आठ महिन्यांचे लोखंडी प्रशिक्षण पूर्ण करून गावात दाखल झाला आणि सारड्याच्या इतिहासात गावातील पहिला आर्मी मॅन हा बहुमान आपल्या नावावर कोरला. आबूच्या स्वागतासाठी गावातील तसेच पूर्व विभागातील मित्रपरिवार, म्हात्रे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुणाई-सगळेच जण प्रचंड उत्साहात एकत्र जमले होते. गावात असा जयघोष झाला की जणू एखादा विजयी सेनापती रणांगणातून परतल्याचा क्षणच सर्वांनी अनुभवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावकर्‍यांच्या तोंडी एकच वाक्य-पुत्र व्हावा असा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा! आज या म्हणीचा खरा अर्थ स्वप्नोजने आपल्या कर्तृत्वाने साकार केला.आई-वडिलांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू चमकत होते, तर गावकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंदाचा तेज. अग्निवीर प्रशिक्षण हे नावालाच कठीण नाही ते जिवालाही आव्हान देणारे असते. शिस्त, कष्ट, धावपळ, युद्धतंत्र, शारीरिक-मानसिक कसोटी या सर्वांचा सामना करून आबूने स्वतःला सिद्ध केलं. हजारो किलोमीटर गावापासून दूर राहून त्याने या कठीण प्रशिक्षणाचा सामना केला, त्याग केला आणि कर्तृत्वाची शिखरे गाठली. यातील सर्वात अभिमानाची बाब म्हणजे रायफल राऊंडमध्ये स्वप्नोज हा १८४० जवानांमध्ये ‘पहिल्या क्रमांकावर’ आला! हा क्षण सारडे गावासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा.

टाइम्स स्पेशल

आधी देश नंतर परिवार! या सैनिकधर्माच्या ओळी आज प्रत्यक्षात उतरताना दिसल्या. स्वप्नोजला देशसेवेसाठी पाठवणारे त्याचे वडील शशिकांत म्हात्रे आणि आई संगीता म्हात्रे यांचा त्याग पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले. एका आईच्या पोटी जन्मलेला मुलगा आता संपूर्ण राष्ट्राचा झाला आहे. ही भावना आज सर्वांच्या हृदयात दाटून आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg