loader
Breaking News
Breaking News
Foto

इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड परीक्षांमध्ये रोटरी स्कूलचे घवघवीत यश

खेड (प्रतिनिधी) - इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिंपियाड (आय. जी. के. ओ.), इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड (आय.इ.ओ.), इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिंपियाड (आय.एम.ओ.), इंटरनॅशनल सायन्स ऑलिंपियाड (आय.एस.ओ.) या प्रथम पातळीवरील परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत यश संपादन केले. इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिंपियाड (आय. जी. के. ओ.) या प्रथम पातळीवरील परीक्षेमध्ये आराध्य मेहता, इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड (आय.इ.ओ.) या प्रथम पातळीवरील परीक्षेमध्ये सान्वी पाटील, हिबा खान, शौर्य गवस, इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिंपियाड (आय.एम.ओ.) या प्रथम पातळीवरील परीक्षेमध्ये सान्वी पाटील, हिबा खान, कविश केकाणे, अर्णव घुमरे, पूर्वी सुर्यवंशी, विराज गावडे, वीर कालेकर, आराध्य मेहता, आयुष माळेकर, अद्वैत मळणगावकर, मीत सावंत, नुरेन परकार, प्रणव गांगर्डे, प्रणव देवकाते, सई कदम, शौर्य गवस, शौर्य जैन, स्पंदन धामणे, स्वरा चाळके, स्वरा पोरे, स्वराज कदम, विभा मानकर, विश्वतेज महाडिक, श्लोक आग्रे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इंटरनॅशनल सायन्स ऑलिंपियाड (आय.एस.ओ.) या प्रथम पातळीवरील परीक्षेमध्ये सान्वी पाटील, कविश केकाणे, अधिराज गाडबैल, अर्णव घुमरे, अशर चौगुले, पूर्वी सुर्यवंशी, विराज गावडे, खुशी रोडे, रुहाब रावल, वीर कालेकर, झैनुद्दीन परकार, आराध्य मेहता, अद्वैत मळणगावकर, प्रणव देवकाते, प्रिशा शिगवण, सई कदम, शौर्य गवस, श्रावी महाडिक, स्पंदन धामणे, स्वरा पोरे, दिग्विजय बंडगर, दिग्विजय धुमाळ, हिबा लंबाडे, कृष्णा रोकडे, एन. एस. कविन, श्रेयश इमाडे आणि श्रेयसी भगत या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

वरील सर्व विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीवरील परीक्षेसाठी निवड झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व इंग्रजी, विज्ञान, गणित व समाजशास्त्र विषय शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वितांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg