loader
Breaking News
Breaking News
Foto

भटक्या कुत्र्यावरून वाद पेटला, जैन मुनी निलेशचंद्र यांचा संताप

मुंबई : बिबट्या, वाघ आणि भटकी कुत्री यावर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मोठा मुद्दा मांडण्यात आला. पुण्यात दिवसागणिक कुत्र्यांची संख्या वाढत आहे. ज्येष्ठ नागरीक आणि मुलांवर कुत्री हल्ला करतात. त्यामुळे रस्त्यावरून फिरणे सुद्धा जिकरीचे झाल्याचा मुद्दा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिवेशनात मांडला. यावेळी त्यांनी प्राणी मित्रांवर निशाणा साधला. राज्यातील सर्व मोकाट कुत्री या प्राणी मित्रांच्या घरी सोडा. त्यांना पण कळू दे की कुत्र्याचा चावा काय असतो, असे विधान लांडगे यांनी केले होते. त्यानंतर वाद पेटला आहे. मुंबईतील जैन मुनी निलेशचंद्र यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी आमदार महेश लांडगे यांना मोठे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महेश लांडगे हिंदूवादी विचारधारेचे नेते आहेत. पण कुत्री पशुप्रेमींच्या घरी पाठवा असे विधान ते करतात. माझे लांडगे यांना आवाहन आहे की, त्यांनी त्यांच्याकडे जितकी कुत्री आहेत. ती पाठवून द्यावी. आम्ही जैन समाज येथून गाडी पाठवतो. तुमच्याकडे जितकी कुत्री जमतील. ती सर्व आमच्याकडे पाठवा. आम्ही गायींसाठी गोशाळा चालवतो. तसेच कुत्र्यांसाठी आम्ही तजवजी करू असे जैन मुनी निलेशचंद्र यांनी जाहीर केले.

टाइम्स स्पेशल

जगात प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. मुक्या प्राण्यांवर, पशुपक्षी, कबुतर, कुत्री, हत्ती, उंदीर यांच्याविरोधात लोकं बोलत आहेत. प्राण्यांना पृथ्वीर जागण्याचा अधिकार आहे की नाही? असा सवाल जैन मुनी यांनी विचारला. मनीषा कायंदे ,चित्रा वाघ यांनी कबुतराच्या विषय काढला. भाजपचे आमदार, खासदार प्राण्यांच्या मागे लागले आहे का? असा सवाल जैन मुनींनी केला आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार असताना एमआयएमचा एकही आमदार नव्हता. मात्र आता प्रत्येक जागेवर एमआयएम उभा आहे. ते आपल्या जातीसाठी एकत्र येतात. मोदींनी घोषवाक्य दिले बेटेगे तो काटेंगे तसंच अहिंसा प्रेमी आमचा जैन समाज आहे. आमचा समाज पशुप्रेमी आहे. सनातन धर्म पण बोलतात पहिली भाकरी गाईला द्या आणि दुसरा कुत्र्यांना द्या. नंतर अन्य पशु पक्षांना द्या. त्यामुळे माझं महेश लांडगे यांना आवाहन आहे की देशविघातक प्रवृत्तींच्या विरोधात उभे राहा. प्राण्यांच्या मागे लागू नका. . .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg