loader
Breaking News
Breaking News
Foto

सांगवे सोसायटी चेअरमनपदी भालचंद्र सावंत यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी)- सांगवे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी भालचंद्र सावंत यांची निवड करण्यात आली. सोसायटीच्या कार्यालयात मंगळवारी झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. चेअरमनदी निवड झाल्यानंतर भालचंद्र सावंत यांचे सांगवे सरपंच संजय उर्फ बाबू सावंत यांनी सत्कारपर अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सांगवे, कनेडी येथील संस्था कार्यालयात झालेल्या निवडीनंतर भालचंद्र सावंत यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सांगवे उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, व्हाईस चेअरमन पंडित कांबळे, माजी चेअरमन बाबू वाळके,सोसायटी संचालक विजय भोगटे, सुरेश सावंत, माजी ग्रा.पं.सदस्य अशोक कांबळे, नाना जाधव, कुंभवडे माजी उपसरपंच रॉबर्ट डिसोजा, नंदकिशोर गावकर, सांगवे पोलीस पाटील दामोदर सावंत, सांगवे सोसायटीचे सचिव गौरव सावंत व सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

सांगवे सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी व सभासदांना सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. आपल्यावर दिलेली जबाबदारी व दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार आहे. सांगवे सोसायटीच्या माध्यमातून अधिकाधिक सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सर्वांच्या सहकार्यातून करणार आहोत, असे चेअरमपदी निवड झाल्यानंतर भालचंद्र सावंत यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg