loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षिका ऋतुजा गवस कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित

दोडामार्ग (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तसेच शेकडो किलोमीटर दूर राहून आजच्या पिढीला शिक्षित करणाऱ्या एक शिक्षिका मुख्याध्यापक अशी जबाबदारी पार पाडत असताना शालेय मुलांसाठी विविध उपक्रम राबवत मुलांसमोर नवा आदर्श निर्माण करणाऱ्या ऋतुजा रविंद्र गवस यांना नुकताच कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे. मुंबई पञकार भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात वितरण करण्यात आले. विविध मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ऋतुजा रविंद्र गवस प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून नवी मुंबई येथे निवास आहे. मूळच्या त्या तळकोकणातील आहेत. यावेळी सतीश कळझुनकर, यावेळी कोकणातील सामाजिक तसेच पञकार क्षेत्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्याअशा शंभर मान्यवर व्यक्तीचा गौरव करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg