loader
Breaking News
Breaking News
Foto

४२ वी राष्ट्रीय ज्युनिअर टेनिक्वाईट स्पर्धेत आदर्श कदम व सायली जाधव यांची चमकदार कामगिरी

जम्मू - तावी येथे दि. २६ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान झालेल्या ४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर टेनिक्वाईट स्पर्धेत महाराष्ट्राच्या ज्युनिअर मुलांच्या संघाने तामिळनाडूचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून प्रथमच सांघिक सुवर्णपदक पटकावून सुवर्ण इतिहास रचला. या भव्य यशात चिपळूणचा उदयोन्मुख खेळाडू आदर्श सचिन कदम याने बजावलेली भूमिका अत्यंत उल्लेखनीय ठरली. स्पार्कस स्पोर्ट्स क्लब व आदर्श क्रीडा प्रबोधिनीचा नियमित खेळाडू असलेल्या आदर्श हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण शहरप्रमुख सचिन उर्फ भैया कदम यांचा चिरंजीव असून संपूर्ण शहरासाठी ही विशेष अभिमानाची बाब ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यशामागे आदर्श अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक व महाराष्ट्र राज्य संघाचे संघव्यवस्थापक मनिष काणेकर यांचे मार्गदर्शन आणि रणनीतीचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षण पद्धती व संघबांधणीमुळे राज्य संघाने सुवर्णपदकाची ऐतिहासिक किमया साधली. याच स्पर्धेत मुलींच्या गटातही चिपळूणचा तितकाच उज्ज्वल ठसा उमटला. आदर्श अकॅडमीचीच प्रतिभावान खेळाडू सायली जाधव हिने प्रभावी खेळ करून महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला बळ दिले. तिच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर चिपळूणमध्ये तिचेही उत्स्फूर्तपणे स्वागत करून गौरव करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

विजयानंतर आदर्श क्रीडा प्रबोधिनी, आदर्श महिला मंडळ व रत्नागिरी जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनतर्फे आदर्श कदम आणि सायली जाधव या दोघांचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष सचिन उर्फ भैया कदम, उपाध्यक्ष व्यंकटेश कररा, खजिनदार प्रवीणकुमार आवळे, किशोर सातपुते, समीर माळी, प्रकाश कदम, विजय उतेकर, जतीन घटे, सुधीर जाधव, अभिषेक मोरे, मनोज जाधव, महेंद्र काणेकर, सोहम कदम तसेच जान्हवी कदम, चिखले, घटे, विशाखा उतेकर, जाधव, अपर्णा महाडिक, रतिका शिंदे उपस्थित होते. चिपळूणच्या दोन उदयोन्मुख खेळाडूंनी आदर्श कदम आणि सायली जाधव यांनी राष्ट्रीय स्तरावर नोंदवलेली ही चमकदार कामगिरी जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेला नवी स्फूर्ती देणारी ठरली असून भविष्यातही ते महाराष्ट्राचा झेंडा आणखी उंचावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg