loader
Breaking News
Breaking News
Foto

सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वरवेली (गणेश किर्वे) - शेतकऱ्यांच्या वाढत्या समस्या, उत्पादन खर्चात होणारी वाढ आणि उत्पादनातील घट लक्षात घेता गटशेती करणे हाच शेतकऱ्यांच्या प्रगतीचा परिणामकारक मार्ग असल्याचा संदेश तालुका कृषी अधिकारी गुहागर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाट पन्हाळे ग्रामपंचायत येथे आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षण कार्यक्रमातून देण्यात आला. पाणी फाउंडेशनचे मुख्य प्रशिक्षक अवधूत गुरव आणि लहूराज दरेकर यांनी पाणी फाउंडेशन चा प्रवास पाणी फाउंडेशन काय काम करते ? फार्मर कप स्पर्धेचा उद्देश. गटशेतीचे फायदे व पुढील तीन दिवसीय गटप्रमुखांचे निशुल्क प्रशिक्षण कसे असते याविषयी सविस्तर माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस (SOP) च्या माध्यमातून शाश्वत शेती, उत्पादन वाढ आणि गटशेतीची प्रभावी अंमलबजावणी हा फार्मर कप स्पर्धेचा प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे शेतकरी अधिक संघटित होऊन त्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास तालुक्यातील गट शेती करण्यास इच्छुक असणारे शेतकरी, चिपळूण उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, गुहागर तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर व तालुका कृषी कार्यालय गुहागरतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg