loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलमध्ये ‘मूल्यशिक्षण संवर्धन कार्यशाळा’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) यांच्यावतीने मूल्यशिक्षण संवर्धन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, आत्मशिस्त, सकारात्मक जीवनदृष्टी आणि नैतिक मूल्यांची जपणूक हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. प्रमुख मान्यवर मनोहर दास, वल्लभ चैतन्यदास, विश्वनाथ परांजपे यांच्या उपस्थितीत सकाळी ठीक 9.30 वाजता या कार्यशाळेचा प्रारंभ झाला. उपस्थित सर्व मार्गदर्शक स्वामीजींचे स्वागत संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुस्तकरुपी भेट देऊन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यशाळेत इस्कॉनचे मार्गदर्शक स्वामीजींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत योग्य मूल्यांचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. मोबाइल व्यसन, अनियंत्रित जीवनशैली, तणाव, सामाजिक वर्तन, आदर, एकाग्रता, सेवा आणि समर्पण यांसारख्या विषयांवर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसोबत इस्कॉनतर्फे आयोजित ‘जगातील सर्वात मोठी मूल्यशिक्षण संवर्धन स्पर्धा’ याची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना मनःशांती, आरोग्यदायी जीवनशैली, तीव्र बुद्धी, आनंदी मन आणि चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. सदर कार्यशाळेसाठी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले व विविध उपक्रमांद्वारे मूल्य शिक्षणाची गरज त्यांनी आत्मसात केली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, उच्चमाध्यमिक विभागप्रमुख राहूल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक व व्यवस्थापन यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून सकारात्मक जीवनमूल्ये शिकून घरी आणि समाजात सद्वर्तन राखण्याचा संकल्प केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg