loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव अनंतात विलीन

पुणे- महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे साक्षीदार असलेले समाजवादी नेते व हमाल पंचायतीचे संस्थापक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक चळवळीतील एक खंदा नेता महाराष्ट्राने गमावला. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीचे मोठी हानी झाली. बाबा आढाव यांचा पार्थिव देह अनंतात विलीन झाला आहे. शदर पवार, अजित पवार, राहुल गांधी यांच्यासह राज्यातील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बाबासाहेब पांडुरंग आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक व कामगार चळवळीचे आधारस्तंभ मानले जातात.त्यांच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'हमाल पंचायत'ची स्थापना, ज्याद्वारे त्यांनी पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले. त्यांनी जातीभेदाविरुद्ध लढण्यासाठी 'एक गाव एक पानवठा' या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व केले होते आणि समाजात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता.

टाइम्स स्पेशल

फळी आहे. भूमिका घेताना परिणामांची, प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक, पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉ. बाबा आढाव ह्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. आज जेव्हा त्यांच्या निधनाचं वृत्त समजलं तेव्हा त्यांचा संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सारा पट डोळ्यासमोरून गेला. 'एकाकी मजदूर' चळवळ, कामगारांच्या हक्कांसाठीची त्यांची अखंड झुंज, समतेवर आधारित समाजरचनेचा त्यांचा ठाम निर्धार अशा सर्व भूमिकांमधून ते सतत प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत राहिले. आजच्या सामाजिक दृष्ट्या अस्थिर, विषमतेने, विद्वेषाने ग्रासलेल्या काळात बाबा आढाव ह्यांच्यासारख्या निडर, विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील, अशा शब्दांत शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg