loader
Breaking News
Breaking News
Foto

कोलझर पंचक्रोशीतील वन्यजीव प्राण्यांचा बंदोबस्त करण्याबाबतचे जिल्हा बँक अध्यक्षांना निवेदन

साटेली (प्रतिनिधी) - कोलझर पंचक्रोशीतील शेतीचे नुकसान करणार्‍या वन्यजीव प्राण्यांचा बंदोबस्त करा असे शेतकर्‍यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग अध्यक्ष मनिष दळवी यांना लेखी निवेदन देत त्यांचे लक्ष वेधले. याबाबत पालकमंत्री नितेश राणे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असे आश्वासन श्री. दळवी यांनी शेतकर्‍यांना दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोलझर विविध कार्यकारी सहकारी सह. सेवा सोसायटीच्यावतीने शेतकरी बागायतदार मेळावा कोलझर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक देसाई यांनी शंभरहुन अधिक शेतकर्‍यांच्या सहीचे लेखी निवेदन दिले. दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, कोलझर पंचक्रोशीतील शेतकरी आपणांस निवेदन देती की, कोलझर पंचक्रोशीतील शेतकर्‍यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून शेतकर्‍यांचे उत्पन्न यावर अवलंबून आहे, परंतू गेल्या काही वर्षात वन्यप्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. वन्यप्राणी शेतातील पिकांचे अतोनात नुकसान करत आहेत. शेतकरी दिवस रात्र मेहनत करून शेती करतात. खतपाणी घालून शेतजमीन, बागायती करून आपल्या वर्षभराच्या अन्नपाण्याचा प्रश्न सोडवतात. मात्र या वन्यप्राण्यांच्या हल्यामुळे आज संपूर्ण पिक उध्वस्त होताना दिसत आहे. त्यामुळे बागायती व शेती व्यवसाय पूर्णतः आज धोक्यात आला आहे. आपण ह्या विषयावर पालकमंत्र्यांशी चर्चा करावी व आम्हा सर्व शेतकरी बांधवांना योग्य मार्ग काढून द्यावा असे लेखी निवेदनात म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg