loader
Breaking News
Breaking News
Foto

शर्मिन निसार चौगुले हिने मिळवली पीएचडी पदवी

रत्नागिरी : जयगड, रत्नागिरी हे मूळ गाव असलेल्या शर्मिन निसार चौगुले हीने जिद्दीने आणि स्वकष्टाने पीएचडी पदवी प्राप्त केली. B.Com झाल्यानंतर तिने C.S.(company secretary) degree घेतली. एका बाजूने तिने LLB. व. LLM चे शिक्षण ही पूर्ण केले. तिला पुणे येथे एक जॉब मिळाला होता तिकडे ती काम करत असताना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याचे ठरविले व त्या दिशेने हालचाल केली तिच्या या मेहनतीला यश मिळाले आणि Law PhD साठी तिला admission मिळाले. हे सर्व तिने आपल्या स्वतःच्या बळावर स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर मिळविले. कुणाची ही मदत न घेता हे सर्व केले. तिला इटली देशामध्ये प्रवेश मिळाला. इटली मध्ये PhD चे शिक्षण घेत असताना तिने एका बाजूने नोकरी ही केले कारण ती आपल्या आईला खर्चासाठी ही पैसे पाठवायची. तिच्या वडिलांचे एप्रिल 2020 मध्ये निधन झाले. आई वडिलांची एकुलती मुलगी असल्याने तिने हे सर्व जबाबदारीने पूर्ण केले. काम करत असताना तिने एका बाजूने मन लावून अभ्यास केला व ही degree संपादन केली. तिने Law मध्ये PhD संपादन केली.3 Dec 2025 रोजी इटली येथे झालेल्या त्याच्या एका कार्यक्रमात तिला ती सिव्हिल लॉ ॲन्ड कॉन्स्टिट्यूशनल लिगालिटी पदवी प्रदान करण्यात आली. आपल्या रत्नागिरी साठी व तिच्या गावासाठी ही अभिमानाची बाब आहे.या मुलीने चौगुले कुटुंबियांचे नाव मोठे केले. आमच्या चौगुले कुटुंबासाठी ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.तिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg