loader
Breaking News
Breaking News
Foto

वंदे भारत एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी

खेड : सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस कायम हाऊसफुल्ल धावत आहे. एक्प्रेसचे प्रवासी सातत्याने प्रतीक्षा यादीवर रहात आहेत. ८ डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसला आणखी ८ ते १२ डबे जोडून कोकणवासियांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रोहन विचारे यांनी केली आहे. एक्स्प्रेसच्या मालकीसह देखभाल कोकण रेल्वेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणीही केली आहे. कोकण मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावू लागल्यापासून कायम प्रतीक्षा यादीसह धावत आहे. महागडा प्रवास असूनही कोकणवासियांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या या एक्स्प्रेसला सद्यस्थितीतील ८ डबे अपुरे पडत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषतः सणांच्या कालावधीत प्रवाशांच्या हाती प्रतीक्षा यादीवरील तिकिटे पडत आहेत. यामुळे वंदे भारतमधून प्रवास करण्याच्या आशेवर पाणी फेरत आहे. प्रवासी मुंबई-गोवा कोकण मार्गावरील संख्या सुट्टीच्या हंगामात झपाट्याने वाढते. वंदे भारत एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे जोडल्यास कोकणवासियांना दिलासा मिळू शकेल. एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg