loader
Breaking News
Breaking News
Foto

सोमजाई माता क्रीडा मंडळाचा ४२ वा क्रीडा महोत्सव उत्साहात

म्हसळा – रायगड तालुक्यातील सोमजाई माता व स.स. काडशिधेश्वर स्वामी यांच्या आशीर्वादाने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सोमजाई माता क्रीडा मंडळ, म्हसळा-खरसई यांच्या वतीने आयोजित ४२वा क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळी मोसमात महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत रुजलेल्या लोकप्रिय कबड्डी खेळाला योग्य व्यासपीठ मिळावे, जिल्ह्यातील क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळावे आणि खेळातील आनंद सर्वांना मिळावा या उद्देशाने हा महोत्सव भरविण्यात आला. मंडळाचे प्रमुख चंद्रकांत खोत, अध्यक्ष काशिनाथ पयेर, सचिव काशिनाथ शितकर, खजिनदार पांडुरंग कांबळे, ज्येष्ठ नेते नथूराम खोत तसेच सर्व मान्यवर सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन यंदाचा महोत्सव भव्यदिव्य आयोजित केला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्घाटन समारंभास माजी सभापती महादेव पाटील, गाव अध्यक्ष महादेव नाक्ती, रायगड बँकेचे माजी संचालक परशुराम मांदाडकर, खरसई आगरी समाज मुंबईचे अध्यक्ष परशुराम माळी, यशवंत लक्ष्मण पाटील अध्यक्ष, क्रांतीनगर मंडळ वारळ, भाजप अध्यक्ष महेश धर्मा पाटील, गाव पाटील हरिश्चंद्र पाटील, माजी सरपंच नीलेश मांदाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत २२ संघांनी सहभाग नोंदविला होता. अतिशय चुरशीच्या आणि रोमांचक सामन्यांनंतर खालील संघांनी विजेतेपदाची कमान आपल्या नावे केली.

टाइम्स स्पेशल

या मध्ये प्रथम क्रमांक श्रीराम क्रीडा मंडळ तुरंबाडी, द्वितीय क्रमांक गावदेवी क्रीडा मंडळ खरसई विद्यानगरी, तृतीय क्रमांक श्री हनुमान क्रीडा मंडळ खरसई, चतुर्थ क्रमांक श्री सोमजाई माता क्रीडा मंडळ खरसई यांनी पटकावला. महोत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे प्रमुख चंद्रकांत खोत, अध्यक्ष काशिनाथ पयेर, कार्यकर्ते पांडुरंग माळी, लक्ष्मण पाटील, नरेश काळकर, रामचंद्र मांदारे आणि अन्य सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. सोमजाई माता क्रीडा मंडळाचा हा पारंपरिक क्रीडा महोत्सव ग्रामीण क्रीडापटूंना मिळणारा विश्वासाचा आणि कौशल्य सिद्ध करण्याचा हक्काचा मंच ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg