loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शाळा सडे जांभारी नं. २ शाळेचे सुयश

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुकास्तरीय शिक्षण विभाग आयोजित ५३ व्या विज्ञान प्रदर्शनात आदर्श शाळा सडे जांभारी न. २ शाळेने विद्यार्थी प्रतिकृती मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. शिक्षण विभाग आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी प्रतीकृतीमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सडे जांभारी न. २ नंबर शाळेने शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी सौर चाळणी या विषयावर अंतर्भूत मॉडेल तयार केले होते. यामध्ये परीक्षानानंतर या प्रतिकृती ला प्रथम क्रमांक देण्यात आला. प्रशालेचे विद्यार्थी निकुंज संजय दावडे, वैष्णवी विजय वेलुंडे, ऋषिकेश दिलीप डिंगणकर या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष रामचंद्र मुंडेकर, उदय सखाराम गोरीवले, पल्लवी पांडुरंग डिंगणकर, विशाल चंद्रकांत पवार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त आदर्श शाळा सडे जांभारी नं.२ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg