loader
Breaking News
Breaking News
Foto

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी २४ तासांत जेरबंद

​सावंतवाडी (प्रतिनिधी): ​अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अत्यंत जलद कारवाई करत केवळ २४ तासांत ताब्यात घेतले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. ​या गंभीर गुन्ह्यातील एका आरोपीला गोवा येथून, तर दुसऱ्या आरोपीला झारखंड येथे पळून जात असताना जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि अत्यंत कमी वेळेत दोन्ही आरोपींना अटक केल्यामुळे, या प्रकरणातील तपासाला गती मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या जलद कारवाई आणि यशस्वी तपासामुळे, गुन्ह्याच्या तपासी अंमलदार आणि आरोपींचा मागोवा घेऊन त्यांना ताब्यात घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानित अधिकारी आणि कर्मचारी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुळीक, तसेच ​आरोपींचा माग काढून ताब्यात घेणारे​पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर,​पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे,​पोलीस हवालदार गौरव परब,​ पोलीस कॉन्स्टेबल बर्गे यांचा समावेश आहे. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुळीक यांच्यासह पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांचाही विशेष सन्मान केला. ​या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम या देखील उपस्थित होत्या. पोलिसांच्या या जलद व प्रभावी कारवाईमुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

पोलीस पथकाचा विशेष सन्मान!

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg