loader
Breaking News
Breaking News
Foto

नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण होणार भारताचा पंतप्रधान? RSS प्रमुख मोहन भागवत काय म्हणाले ?

नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारताचा पुढचा पंतप्रधान कोण असेल? देशालाच नव्हे तर संपूर्ण जगात प्रश्नाची चर्चा असते. अशातच नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारताचा पंतप्रधान कोण होईल याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी खुलासा केला आहे. या प्रश्नावर सरसंघचालकांनी अत्यंत महत्वाचे विधान केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चा शताब्दी सोहळा तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित होते. उपस्थित स्वयंसेवकांनी त्यांना अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरे मोहन भागवत यांनी दिली. कार्यक्रमादरम्यान काही स्वयंसेवकांनी नरेंद्र मोदींनंतर पुढचा पंतप्रधान कोण असेल असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचे उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले की भाजप आणि मोदी या विषयावर चर्चा करून निर्णय घेतील. यामुळे पुढचा पंतप्रधान कोण असेल हे ठरवण्यात मोदी यांचे मत निर्णायक असेल.

टाइम्स स्पेशल

भागवत यांनी त्यांच्या भाषणात भाषिक विविधता आणि सांस्कृतिक अभिमानाचाही जोरदार संदेश दिला. त्यांनी विचारले की तामिळनाडूतील लोकांना तामिळमध्ये स्वाक्षरी करण्यास का संकोच वाटावा? सर्व भारतीय भाषा आपल्या स्वतःच्या भाषा आहेत. त्यांनी लोकांना घरी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधण्याचे, ते जिथे राहतात त्या ठिकाणाची भाषा शिकण्याचे आणि त्यांच्या पारंपारिक जीवनशैलीचे कौतुक करण्याचे आवाहन केले. दक्षिण भारतीय राज्यांच्या संस्कृतीचे कौतुक करताना भागवत म्हणाले की, येथील लोक त्यांचे पारंपारिक पोशाख, भाषा कधीच विसरत नाहीत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg