loader
Breaking News
Breaking News
Foto

स्नेहज्योती अंध विद्यालय घराडी शैक्षणिक संस्थेला आचल फाउंडेशन मुंबईचा प्रतिष्ठेचा पुरस्कार

खेड (प्रतिनिधी) - आचल फाउंडेशन मुंबईचा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्नेहज्योती अंध विद्यालय घराडी या शैक्षणिक संस्थेला आणि सामाजिक युवा पुरस्कार उत्तमकुमार जैन यांना अत्यंत दिमाखदार सोहळ्यात भारतरत्न लता मंगेशकर ऑडिटरियम मीरा भायंदर येथे प्रदान करण्यात आला. या प्रसंगी फिल्मी दुनियेतील अनेक कलाकार तसेच उद्योगपती यांची उपस्थिती होती. प्रसिद्ध अभिनेते लिलीपुट यांनी या प्रसंगी कर्तव्य जाणून केलेले प्रत्येक काम हे समाजसेवेचे धडे असतात असं विधान केले. प्रमुख पाहुणे अजय सेठ (उद्योगपती), सुनील शेट्टी (आर्ट मीडिया, डिजिटल ऍडव्हर्टाईज एजन्सीज लशे), अभिनेता अभिषेक खन्ना यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. स्नेहज्योती अंध विद्यालयाला शैक्षणिक सेवा पुरस्कार देण्यात आला तो मुख्याध्यापक प्रतिभा सेनगुप्ता यांनी स्वीकारला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी आचल चॅरिटेबल फाउंडेशनचे संजय कपूर, रानू कपूर, विजय राय, पार्श्‍वगायिका वर्षा सिंग, कॅप्टन बी. पी. सिंग, मिली सिंग, जेष्ठ संगीतकार नंदू केरकर (सहकारी आर. डी. बर्मन तसेच बप्पी लाहिरी), अभिजित केरकर इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी अंध विद्यालयातील विदयार्थी यांनी सुंदर मराठी प्रार्थना सादर केली आणि प्रेक्षकांची मने जिंकली. पायल सिंग यांनी मुलांचे खास कौतुक करून भेट वस्तू देऊन सन्मान केला. या भव्य सोहळ्यात संगीत, कला, क्रीडा, पुरस्कार देण्यात आले. सुमारे ३ तास सूरू असलेल्या या कार्यक्रमात ट्रीब्युट धर्मेंद्रसाठी त्यांच्या फिल्ममधील गाण्याचे सादरीकरण दिग्गज गायकांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg