loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा येथील सेरेब्रल पाल्सी त्रस्त ऋषिकेशने केले कळसूबाई शिखर सर

म्हसळा (रायगड)- 'माऊंट एव्हरेस्ट’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १६४६ मीटर उंच कळसुबाई शिखरावर रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील सेरेब्रल पाल्सीने त्रस्त असलेल्या २२ वर्षीय ऋषिकेश सुदाम शितल माळी यांनी उल्लेखनीय पराक्रम साध्य केला. कठीण दगडी चढ-उतार, अरुंद लोखंडी शिड्या आणि जीवघेणे मातीचे उतार पार करत ऋषिकेशने तिरंगा फडकवत आपले स्वप्न पूर्ण केले. शिव ऊर्जा प्रतिष्ठानची प्रेरणा, पालकांचा पाठिंबा आणि गिर्यारोहक ज्ञानेश्वर खाडे यांचे मार्गदर्शन यामुळे हा दुर्मीळ यशकथन शक्य झाले. सेरेब्रल पाल्सी असूनही ऋषिकेश रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असून औषधशास्त्र पदविका पूर्ण केली आहे. अलीकडेच त्याने संभाजीनगर येथे झालेल्या पॅराऑलिम्पिक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला होता. कळसुबाई सर करणारा तो सेरेब्रल पाल्सी वर्गातील एकमेव ट्रेकर ठरला आहे. या विलक्षण कामगिरीबद्दल स्विमिंग कोच अर्जुन सोनकांबळे, बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिजामाता तरण तलाव व्यवस्थापक माया जगताप, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या चित्रलेखा पाटील आदी मान्यवरांनी अभिनंदन केले. “प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना पाठबळ द्यावे,”असा संदेश ऋषिकेश याच्या आई शितल माळी यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg