loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुका विज्ञान प्रदर्शनात देवळे हायस्कूलच्या ध्रुवी बागवे हिने पटकावला प्रथम क्रमांक

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुका विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक दिव्यांग 6 ते 8 एस . एन. कानडे आयडियल हायस्कूल देवळेच्या कु.ध्रुवी नामदेव बागवे हिने प्रथम क्रमांक पटकावला. ध्रुवी बागवे हिने अंध व्यक्तींसाठी उपयुक्त अशी टोपी बनवली. अंध व्यक्तींना चालताना, गर्दीतून वाट काढताना ,जिना चढताना, उतरताना मोठी अडचण होत असते. त्या अडचणीवर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून ध्रुवी बागवे हिने टोपी बनवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही टोपी सतत समोरच्या वस्तू तपसात असते. ठराविक अंतरावर अडथळा आल्यास टोपीत असलेल्या सेन्सरला समजते. टोपी मधील स्पीकर बीप असा आवाज करतो व व्हायब्रेशन करतो. त्यामुळे अंध व्यक्तीला ते कळते व तो दिशा बदलतो. अंध व्यक्ती रस्त्यावरून सुरक्षित चालू शकते. काठी शिवाय अडथळे पार करू शकते. गर्दीत अपघात टाळता येतात. अंध व्यक्तीचे स्वावलंबन होते. विज्ञानाचा वापर करून आपण समाजातील दुर्बल व्यक्तींची चांगल्या प्रकारे मदत करू शकतो हा उद्देश या टोपी बनवण्यातून असल्याचे ध्रुवी नामदेव बागवे हिने सांगितले. या यशाबद्दल पंचक्रोशीतून ध्रुवी बागवे तिच्यावर अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे. तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

अंध व्यक्तींसाठी बनवली टोपी

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg