loader
Breaking News
Breaking News
Foto

१४ वर्षांच्या पोराची कमाल! १४ षटकार ठोकत १७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

नवी दिल्ली, : वैभव सूर्यवंशीने युएईविरुद्ध १४ षटकार मारून विश्वविक्रम केला. शुक्रवारी दुबई येथे खेळल्या गेलेल्या १९ वर्षांखालील आशिया कप सामन्यात त्याने ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. या डावात वैभवने १८० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली, ज्यामध्ये १४ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता. दुबई येथील मैदानात १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेच्या युएई विरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारताचा युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीनं धडाकेबाज कामगिरी केली. भारताच्या डावाची सुरुवात करताना पहिल्या पाच चेंडूचा सामना अगदी जपून केल्यावर वैभव युएईच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला. पण द्विशतक अगदी जवळ असताना तो विकेटमागे चतुराईनं चेंडू मारण्याच्या नादात तो बोल्ड झाला. पण त्याआधी त्याने ९५ चेंडूतील १७१ धावांच्या खेळीच्या जोरावर अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याची ही खेळी ९ चौकार आणि १४ षटकारांनी बहरलेली होती. या खेळीतील षटकारांच्या जोरावर १४ वर्षीय पोरानं १७ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आता वैभव सूर्यवंशीच्या नावे झाला आहे. याआधी युवा एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या मायकेल हिल याच्या नावे होता. २००८ मध्ये नामिबीया विरुद्धच्या सामन्यात त्याने १२ षटकार मारले होते. आता १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने १४ षटकारांसह १७ वर्षांपूर्वीचा हा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात दुसरे शतक झळकावताना १७१ धावांच्या खेळीसह त्याने भारताकडून दुसर्‍या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली. वैभव सूर्यवंशीचा प्रत्येक स्पर्धेतील विक्रमाचा धडाका पाहता हाच विक्रम नव्हे तर यंदाच्या हंगामात द्विशतकासह तो नवा विश्ववक्रमही प्रस्थापित करेन, असे संकेत मिळत आहेत. यूथ वनडेत सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या जॉरिच व्हॅन शाल्कविक याच्या नावावर आहे. यावर्षी हरारेच्या मैदानात झिम्बाब्वेविरुद्ध या पठ्‌ठ्यानं २१५ धावांची खेळी साकरली होती.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, भारताने हा सामना २३४ धावांनी जिंकला आहे. ४३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, युएईला ५० षटकांत ७ गडी गमावून फक्त १९९ धावा करता आल्या. युएईच्या दोन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. उद्दिश सुरी ७८ धावांवर नाबाद राहिला, तर पृथ्वी मधुने ५० धावा जोडल्या. भारताकडून ९ गोलंदाजांना आजमावण्यात आले आणि त्यापैकी दीपेश देवेंद्रन सर्वात यशस्वी ठरला, ज्याने २ बळी घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg