loader
Breaking News
Breaking News
Foto

सिकेटी येथे आंतर- महाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन

पनवेल :- जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धा गुरुवार दिनांक ११ डिसेंबर २०२५ व १२ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आंतर-महाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य व मुंबई शहर झोन-१चे उपाध्यक्ष प्रो. डॉ. एस. के. पाटील व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव यांनी केले. त्याचबरोबर मुंबई शहर झोन-१ सचिव डॉ. मनोज वर्मा, मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सचिव डॉ. व्ही. बी. नाईक व मुंबई शहर झोन-१ स्पर्धा सह-सचिव पूनम मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच स्पर्धेमध्ये १२ मुलांचे संघ आणि १० मुलींच्या संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर व प्रा. प्रतिज्ञा पाटील, जिमखाना विभागाचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg