loader
Breaking News
Breaking News
Foto

कशेडी बोगदा परिसरात भूस्खलनाला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना सुरु

खेड (दिलीप देवळेकर)- मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगदा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या भूस्खलनामुळे महामार्ग तासन्तास ठप्प होण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार भूस्खलन प्रतिबंधासाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाची नामांकित कंपनी असलेल्या उत्तराखंड येथील तेहरी हायड्रो इलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (THDC) या संस्थेच्या माध्यमातून कशेडी बोगद्याच्या परिसरात डोंगर उतारांवर रॉक बोल्टिंग तसेच तारेची संरक्षक जाळी बसविण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. या उपाययोजनांमुळे डोंगर कड्यांतील सैल खडक व माती स्थिर राहून दरड कोसळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या वर्षी कशेडी बोगद्याच्या सुरुवातीच्या भागात डोंगर कपारीतून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. यामुळे महामार्गावरील एक लेन अनेक तास बंद राहिली होती. तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनांचा गांभीर्याने विचार करून त्या दोन्ही ठिकाणीही रॉक बोल्टिंग व तारेची जाळी लावून भूस्खलन प्रतिबंधक काम सुरू करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील कशेडी बोगद्याच्या समोरील महामार्गालगत असलेल्या डोंगराळ भागात हे काम युद्धपातळीवर सुरू असून, येत्या पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका उद्भवणार नाही, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. या उपाययोजनांमुळे मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार असून प्रवाशांना पावसाळ्यात होणाऱ्या तासन्तासांच्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

पावसाळ्यातील धोका टळणार

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg