loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात घोडबंदर रोडवर बेशिस्त वाहनचालकांना चाप, ठाणे आरटीओची कडक कारवाईला सुरुवात !

ठाणे (अमोल पवार) - ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे नागरिकांची प्रचंड हालअचल होत असतानाच, नामदार प्रताप सरनाईक यांच्या सूचनेवरून, ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) कडक पावले उचलत घोडबंदर रोडसह महत्त्वाच्या मार्गांवर बेशिस्त वाहनांवर धडक कारवाई सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. येत्या काही दिवसांत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीम राबवली जाणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या आदेशानुसार वायुदत पथक क्रमांक १ ते ५, तसेच १० मोटार वाहन निरीक्षकांना तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. शीतपेय गाड्या, ट्रॅव्हल्स, खाजगी बस, वजनदार वाहने तसेच नियमबाह्य पार्किंग, परवाना नोंदणीतील त्रुटी, ध्वनी-प्रदूषण वाढवणारे फेरफार अशांसह सर्व प्रकारच्या नियमभंगांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनेक वाहनचालकांकडून हेल्मेट न वापरणे, लेनची शिस्त न पाळणे, दुचाकींवर तिघे जण बसवणे, अवैधपणे मालवाहतूक करणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे असे प्रकार नियमितपणे दिसत आहेत. घोडबंदर रोड, पूर्व–पश्चिम एक्सप्रेस द्रुतगती मार्ग, कळवा माजीवाडा परिसरात वाहतूक कोंडीला यामुळे मोठ्या प्रमाणावर खतपाणी मिळत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी ‘विशेष तपासणी मोहीम’ तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, दररोज कडक दंडात्मक कारवाई, वाहन जप्ती, परवाना रद्द करणे, तसेच रिपीट ऑफेंडरवर अधिक कठोर दंडांची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील अनियंत्रित वाहनचालकांमुळे होणारे अपघात, अनावश्यक हॉर्न, आणि नियमभंगामुळे निर्माण होणाऱ्या गोंधळातून अखेर दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg