loader
Breaking News
Breaking News
Foto

व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्यपूर्ण वाचन आवश्यक : पोलीस उपनिरीक्षक विलास दिडपिसे

खंडाळा : आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि वाढत्या प्रसारमाध्यमांच्या काळात विद्यार्थ्यांवर संस्कार होणे काळाची गरज आहे. यासाठी त्यांना आपल्या महामानवाच्या जीवनाची, त्यांच्या कार्याची व संघर्षाची माहिती असणे गरजेचे आहे. त्यातूनच त्यांचा व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो. म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने आणि जाणीवपूर्वक वाचन करणे आवश्यक असल्याचे मत सागरी पोलीस ठाणे जयगडचे पोलीस उपनिरीक्षक विलास दिडपिसे यांनी व्यक्त केले. रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेच्यावतीने महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सलग १२ वाचन उपक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लहान वयात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाल्यास असे विद्यार्थी भविष्यात यशस्वी वाटचाल करत असतात. त्यासाठी शाळेने राबविलेला हा उपक्रम उपयुक्त ठरतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थित असणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष निंबाळकर यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती सांगताना विद्यार्थी सलग १२ तास वाचनास बसले आहेत, ही बाब नक्कीच समाधानकारक असून, सातत्याने असे उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच अशा उपक्रमाची व्याप्ती वाढवून परिसरातील शाळांनीही या उपक्रमात सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमात युयुत्सु आर्ते यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना वाचताना काय वाचले पाहिजे आणि त्यासाठी ते वाचन आत्मसात व्हावे यासाठी काय करता येईल याबाबत माहिती दिली. या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी आवर्जून उपस्थित असणारे बसणी हायस्कूलचे मुख्याध्यापक पांडुरंग नाईक यांनीही या उपक्रमात मी काय वाचलेले आहे हे सांगण्यासाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता या उपक्रमाची यशस्वीता दिसून येते आणि आपण वाचलेले ते न अडखळता सांगतात यातूनच उपक्रमाचे महत्व समजून येत असल्याची माहिती दिली.

टाइम्स स्पेशल

या स्तुत्य उपक्रमाला दूरध्वनीवरून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, महाराष्ट्र राज्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा ज्योती ठाकरे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, माजी शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, माजी गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg