loader
Breaking News
Breaking News
Foto

धामापूर गटात शिवबंधनाची नवीन लाट; उद्योजक अजय चव्हाण यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - धामापूर जिल्हा परिषद गट - पंचायत समिती गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक पकड पुन्हा अधिक मजबूत होताना दिसते. पक्षाचे नेते सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उद्योजक अजय चव्हाण यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधत पक्षात जाहीर प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. ग्रामीण भागातील उद्योजक वर्गाचा पक्षावरील वाढता विश्वास आणि त्यातून निर्माण होणारी संघटनशक्ती ही शिवसेनेसाठी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर महत्त्वाची घडामोड ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक व उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, जिल्हा संघटक संतोष थेराडे, महिला जिल्हा संपर्क प्रमुख नेहा माने, उपजिल्हा संघटिका आणि माजी पंचायत समिती सभापती धनश्रीताई शिंदे, तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर यांसह जिल्ह्यातील सर्व पातळ्यांवरील पदाधिकाऱ्यांची प्रभावी उपस्थिती लाभली. सावर्डे उपतालुका प्रमुख संदीप राणे, राजाभाऊ नारकर, सचिन शेट्ये, विभाग प्रमुख अनिल मोरे, सागर सावंत, अजित गुजर, तालुका प्रसिद्धी प्रमुख सचिन चोरगे, संगमेश्वर महिला आघाडी संघटिका मेघा कदम तसेच चिपळूण महिला आघाडीच्या सोनाली चव्हाण, रेश्मा चव्हाण, नंदिनी जड्याळ, पूनम चाळके, वृषाली पाटणकर व युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा सहभाग पक्षाच्या तळागाळातील बांधिलकीची पुष्टी करतो.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण राजकीय संदेश देण्यात आला. स्थानिक प्रश्न, संघटनाची पुढील दिशा आणि आगामी निवडणूक रणनीती याबाबत सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण केले. धामापूर गटातील हा शक्तीप्रदर्शनाचा मेळावा केवळ नवीन प्रवेशापुरता मर्यादित राहिला नाही, तर शिवसेना आगामी निवडणुकांत अधिक संगठित, अधिक निर्धाराने उतरू पाहतेय, याची जाणिव करून देणारा ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg