loader
Breaking News
Breaking News
Foto

महावितरणचे कार्यालय शहराबाहेर जावू देणार नाही, गुहागर भाजपचा निवेदनाद्वारे इशारा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागरातील महावितरणचे कार्यालय शहरामध्येच राहिले पाहिजे. यासाठी आम्ही जागेसाठीही सहकार्य करू. जर हे कार्यालय शहराबाहेर इतरत्र कुठे घेवून जाणार असाल तर याचा नाहक त्रास तालुक्यातील जनतेला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे त्यास आमचा विरोध राहील, अशी भूमिका घेत भाजपच्या कायकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयावर मंगळवारी धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. महावितरण कार्यालय शहराच्या बाहेर घेवून जाण्यासंदर्भात अनेक चर्चा गुहागरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होत्या. याबाबत भाजपने दोन महिन्यांपूर्वी गुहागर महावितरणशी पत्रव्यवहार केला गेला. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बाबत कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे याबाबतची खात्री करण्यासाठी भाजपतर्फे ५० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते महावितरणवर धडकले व न कार्यालय अन्यत्र कुठेही हलवण्याबाबत ठणकावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी दिलेल्या निवेदनात, कार्यालयात शहरात राहण्यासाठी कुठल्याही सहकार्याची हमी देताना है कार्यालय गुहागरमध्येच राहिले पाहिजे, असा आग्रह धरला. यावेळी उपकार्यकारी अभियंता सुनील सूद यांनी सांगितले, आम्ही शहर सोडून हे कार्यालय इतरत्र कुठेही घेवून जाणार नाही. तुमच्या पत्रावर खुलासा आमच्या कार्यालयाकडून राहून गेला. हे आम्ही मान्य करतो. सद्यस्थित असलेले कार्यालय पावसाळ्यात त्रासाचे आहे. यामध्ये पाणी गळती होते. त्यामुळे पावसाळ्यात चार महिने काम करणे सोईचे होत नाही, असे स्पष्ट केले.

टाइम्स स्पेशल

यावेळी गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, जिल्हा सरचिटणिस निलेश सुर्वे, तालुका सरचिटणिस संतोष सांगळे, सचिन ओक, महिला आघाडी अध्यक्षा प्रांजली कचरेकर, किरण खरे, तालुका पदाधिकारी साईनाथ कळझुणकर, अक्षय रहाटे, स्वप्नील झगडे, प्रशांत रहाटे, प्रशांत करचरेकर, दीपक परचुरे, दत्ताराम जांगळी, गणेश तेलगडे, दशरथ जांगळी. अमित जोशी, विकास मालप आदी उपस्थित होते. महावितरण कंपनीच्या निकषाप्रमाणे कार्यालयासाठी दुसरी जागा मिळत नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती उपकार्यकारी अभियंता सुनील सूद यांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg