loader
Breaking News
Breaking News
Foto

लाडघर येथे वाळू शिल्प बनवण्याचे प्रशिक्षण व वृक्षारोपण कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद

दापोली (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील लाडघर येथे वाळू शिल्प बनवण्याचे प्रशिक्षण व वृक्षारोपण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. लाडघर समुद्रकिनाऱ्याला मिळालेल्या अभिमानास्पद ब्ल्यू फ्लॅग नामांकनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने ग्रामपंचायतच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमासाठी दापोली तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. समुद्रकिनाऱ्यावरील वाळूचा वापर करून कला साकारणारे वाळू शिल्प विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गुहागर येथून तीन कुशल वाळू शिल्पकारांना आमंत्रित करण्यात आले होते. शिल्पकारांनी प्रथम विद्यार्थ्यांना वाळू शिल्प कला, आवश्यक तंत्र, पाण्याचा योग्य वापर, रचना आणि साकार करताना लक्षात ठेवावयाच्या बाबींवर मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारी विविध सामाजिक, पर्यावरणीय व सांस्कृतिक संकल्पनांवर आधारित वाळू शिल्पे साकारत आपली कला उजागर केली. अनेक पर्यटक व नागरिकांनीही या उपक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते समुद्रकिनारी वृक्षारोपण करण्यात आले. वनविभागाने या कार्यात पुढाकार घेत विविध जातींची रोपे उपलब्ध करून दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना संबोधित करताना समुद्रकिनारी स्वच्छता राखण्याचे महत्व अधोरेखित केले. ब्ल्यू फ्लॅग मानांकन टिकवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी प्लास्टिकमुक्त, प्रदूषणमुक्त किनाऱ्याकरिता जनजागृतीचे आवाहन केले. या कार्यक्रमास दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, तसेच ग्रामपंचायत सदस्य, वनविभाग अधिकारी, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समुद्रकिनारा संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि विद्यार्थी सहभाग या त्रिसूत्रीमुळे हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण ठरल्याचे सर्वांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg