loader
Breaking News
Breaking News
Foto

जोपर्यंत सूर्य-चंद्र तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई. नागपूर इथं राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावात मुंबईबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचाच भाग राहील."महाराष्ट्र एक सामर्थ्यवान राज्य आहे, यात कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही. हे 106 हुतात्म्यांनी निर्माण केलेले एकसंध महाराष्ट्र आहे. त्यामुळे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल किंवा तोडली जाईल, अशी शंका कोणीही बाळगू नये. निवडणुका जवळ आल्या की अशा चर्चा सुरू होतात. मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचाच भाग राहील. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर, त्यांच्या तत्त्वांवर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गावर चालत राहील..."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

"छत्रपती शिवाजी महाराजांची तत्त्वे महाराष्ट्रात स्वीकारली गेली, परंतु राष्ट्रीय स्तरावर त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज होते. सीबीएसईच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याबद्दल, हिंदवी स्वराज्याबद्दल फक्त एक परिच्छेद होता. पण मुघलांचा इतिहास 17 पानांमध्ये होता. पण आता हा इतिहास बदलला आहे. केंद्र सरकारने आता छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा 21 पानांचा इतिहास सीबीएसईच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे."

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg