loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी पर्यटन शहराची उपेक्षा? वीज यंत्रणा सुधारणेसाठी नागरिकांची आग्रही मागणी

सावंतवाडी : पर्यटन आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी शहरात पायाभूत सुविधांच्या निर्मितीकडे होत असलेल्या दुर्लक्षावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः शहराच्या विद्युत वितरण व्यवस्थेची झालेली दुरवस्था वेळोवेळी उघड होत असून, आगामी काळात निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरणासाठी नागरिकांनी वारंवार मागणी केली आहे. यात, लोंबकळत असलेल्या वीज वाहिन्या आणि जुने झालेले विद्युत पोल, विद्युत जनित्र बदलून वीज वाहिन्या भुयारी मार्गाने टाकण्याची मागणी प्रामुख्याने होत आहे. ​यापूर्वी भुयारी वीज वाहिनी प्रकल्पासाठी तब्बल ११ कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. मात्र, प्रशासकीय दिरंगाई किंवा उदासीनतेमुळे हा निधी परत गेला, ही गंभीर बाब आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या शहरात अनेक ठिकाणी जुने, धोकादायक झालेले वीज पोल, जीर्ण झालेले विद्युत जनित्र आणि धोकादायकपणे लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या दिसत आहेत. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, वीज वितरणातही वारंवार अडथळे येतात. ​नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानानंतर आता निकाल अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर, निवडून येणाऱ्या नवीन लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने जुने वीज वितरण साहित्य निर्लेखन करून तातडीने नवीन अद्ययावत वीज यंत्रणा उभी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. ​सावंतवाडी शहराला पर्यटनपूरक बनवण्यासाठी रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे. विशेषतः वीज वितरण कंपनीने पुढाकार घेत या ११ कोटींच्या भुयारी वीज वाहिनी प्रकल्पाचा प्रस्ताव नव्याने तयार करून तो मंजूर करून आणण्यासाठी जनप्रतिनिधींनी ठोस आणि आग्रही पाठपुरावा करावा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरातील सौंदर्य आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी हा बदल अत्यावश्यक मानला जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg