महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणी ठाणे रेल्वे न्यायालयात सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर होते. परप्रांतीय रेल्वे भरती प्रकरणावरून मनसेने केलेल्या आंदोलनावेळी कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाणीसह स्टेशनचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांच्यासह 8 जणांवर आहेत. मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा मनसेने आरोप केला होता. राज ठाकरे यांच्यावर परप्रांतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा ठपका असून, या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आली होती.2019 पर्यंत हा खटला कल्याण रेल्वे कोर्टात चालवण्यात आला तोपर्यंत एकदाही राज ठाकरे हे कोर्टामध्ये उपस्थित राहिले नव्हते. कल्याण रेल्वे कोर्टाने हा गुन्हा ठाणे सत्र न्यायालयात वर्ग केला. त्यानंतर आजच्या सुनावणीदरम्यान राज ठाकरे स्वत: उपस्थितीत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टासमोर हजर झाले. 2008 रेल्वे भरती परीक्षा मारहाण हे एक प्रकरणी आणि दुसरं ठाण्यात राज ठाकरे यांनी 2022मध्ये सभा घेतली होती. त्या सभेत मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी त्यांना तलवार दिली होती. या दोन्ही प्रकरणासंदर्भात ही सुनावणी न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांच्यासमोर झाली. यावेळी राज ठाकरे यांना विचारण्यात आलं की, तुम्हाला गुन्हा कबुल आहे का? त्यावर राज ठाकरे म्हणाले की, मला गुन्हा कबुल नाही...असं स्पष्टपणे राज ठाकरेंनी सांगितलं. तर कोर्टाने राज ठाकरेंना सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे. कोर्टाने राज ठाकरेंना आवाहन केलं की, तुम्ही सहकार्य करा, एक महिन्यात हे प्रकरण संपेल. तुम्हाला यायची गरजही पडणार नाही.
दरम्यान राज ठाकरेंसह मनसेचे प्रमुख नेते नितीन देसाई, अभिजीत पानसे, अविनाश जाधव आणि नितीन सरदेसाई यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरेंसह मनसेचे हे नेतेही आज कोर्टात हजर होते. ठाणे कोर्टात राज ठाकरे यांच्या बाजूने ॲड. सयाजी नांगरे आणि ॲड. राजेंद्र शिरोडकर यांनी युक्तिवाद मांडला.


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.