loader
Breaking News
Breaking News
Foto

वेताळ बांबर्डे येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात

वैभववाडी (प्रतिनिधी) - आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिला देशाच्या सर्वोच्च पदावर बसू शकतात. तर तोच जोश, जुनून नाग्या महादू आदिवासी मुलांच्या या वसतिगृहातील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेला आहे. विद्यार्थ्यांनी तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या अंगातील कलागुण ओळखून शिक्षणामध्ये आणि जीवनामध्ये अधिकाधिक प्रगतीची उंच उंच शिखरे गाठली पाहिजेत. संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासी समाजातील वंचित विद्यार्थ्यांना एकत्रीतपणे आणून त्यांना वसतीगृहाची सोय करुन दिली आहे. तर विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य पणाला लावून विद्यालयाचा व वसतीगृहाचे नावलौकिक वाढवावा असे गौरवोद्गार सावंतवाडी तालुका निरीक्षक अ‍ॅड. संदीप चांदेकर यांनी काढले. ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे - कदमवाडी येथील नाग्या महादू आदिवासी मुलांचे वसतिगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी संघटनेचे सावंतवाडी तालुका निरीक्षक अ‍ॅड. संदीप चांदेकर बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी समाजातील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी वसतिगृह सुरू केले हे फार मोठे कार्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय आईर यांनी अविरतपणे सुरू ठेवले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग या संघटनेने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि वसतीगृहातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन वेताळ बांबर्डे-कदमवाडी येथील नाग्या महादू आदिवासी मुलांचे वसतिगृह येथे केले होते. यावेळी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, संघटनेचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा उपाध्यक्ष संजय शेळके, जिल्हा खजिनदार हनिफभाई पिरखान, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संजय खानविलकर, जिल्हा संघटक डॉ.वैभव आईर, मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष प्रकाश माईणकर, कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश चव्हाण, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सोहन शारबिंद्रे, कार्याध्यक्ष मोहिनी मडगांवकर, जिल्हा महिला संघटक शिवानी पाटकर, सावंतवाडी तालुका महिला संघटक रेश्मा परब, सदस्य पूजा नाईक, सहसचिव नितीन नाईक, उद्योजक महेंद्र चव्हाण, चांदेकर, मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर, जिल्हा सहसचिव शाम माडये, मालवण तालुका शहर महिला संघटक मुक्ता रजपूत, मालवण तालुका ग्रामीण महिला संघटक सीमा धुरी, सेवा निवृत्त एस.टी.आगार व्यवस्थापक भोसले, मंगेश सावंत, आनंद बाणे यांच्या सह संघटनेचे जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

सुरुवातीला वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी मल्लखांब वरील विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर श्रावणी मदभावे आणि सतीश मदभावे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक असणार्‍या मोबाईल टुल्सची माहिती देऊन विद्यार्थ्यांना त्याची प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच या प्रसंगी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांचे वसतीगृह चालविणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय आईर आणि आईर या दाम्पत्याचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांना सहाय्य करणार्‍या सेविकांचा देखील शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. तसेच या वसतीगृहातील विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य घेण्यासाठी संघटनेच्या वतीने अ‍ॅड. संदीप चांदेकर यांनी रोख दहा हजार रुपयांनी आर्थिक मदत सुपूर्द केली. तसेच सावंतवाडी तालुका अध्यक्ष सोहन शारबिद्रे यांनी संघटनेच्या वतीने वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी तांदूळ, डाळ आणि खाऊ आदी साहित्य सुपूर्द केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी यांनी देखील मार्गदर्शन केले. शेवटी उदय आईर यांनी सर्वांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg