loader
Breaking News
Breaking News
Foto

त्या आमदाराचा व्हिडिओ कॉल, नोटांची बंडलं… अंबादास दानवेंकडून हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच कॅश बॉम्ब, मोठी खळबळ!

नागपूर हिवाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली. आज दुसऱ्या दिवशी सकाळीच उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा कॅश बॉम्ब टाकला. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (Ambadas Danve Social Media X Handle) एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात तीन व्हिडिओ आहेत. यामध्ये एका व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत. तर इतर व्हिडिओपैकी एकात नोटांची बंडलं दिसत आहेत. विशेष म्हणजे X वरील पोस्टमध्ये अंबादास दानवे यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. पण त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून याविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी कुणाचे नाव घेतलेले नाही. पण या व्हिडिओत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओत नोटांची बंडलं आहे. हा एक व्हिडिओ कॉल असल्याचे समजते. “या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?” असा सवाल अंबादास दानवे यांनी सरकारला विचारला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg