loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मोठा दिलासा, मंत्री बावनकुळे यांनी बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याबाबत दिला शब्द

नागपूर - पुनर्रचित फळपिक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत ‘ई-पिक पाहणी’ व ‘फार्मर आयडी’ या अटींमुळे कोकणातील हजारो आंबा व काजू उत्पादक शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहत असल्याचा गंभीर मुद्दा आमदार शेखर (अनुराधा) गोविंदराव निकम यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडला. कोकणातील डोंगराळ भागात मोबाईल नेटवर्कचा अभाव, वयोवृद्ध शेतकर्‍यांचे तांत्रिक अज्ञान आणि तलाठी-सहाय्यकांवरील कामाचा ताण यामुळे ई-पिक पाहणी प्रत्यक्षात अशक्य ठरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे अनेक शेतकरी यावर्षी फळपिक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पार्श्वभूमीवर, कोणताही फळबागायतदार विमा संरक्षणापासून दूर राहू नये यासाठी ई-पिक पाहणीची सक्ती शिथिल करून स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरण्याची, तसेच आंबा-काजू ही बहुवार्षिक पिके असल्याने एकदा केलेली ई-पिक पाहणी पुढील पाच वर्षांसाठी वैध ठेवण्याची मागणी आमदार निकम यांनी केली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री महोदय बावनकुळे यांनी संबंधित विभागांची बैठक आयोजित करून कोकणातील शेतकर्‍यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे आंबा-काजू उत्पादक शेतकर्‍यांमध्ये मोठा दिलासा आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

आमदार शेखर निकमांनी दिले निवेदन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg