loader
Breaking News
Breaking News
Foto

पुणे ते गोवा, मुंबई ते गोवा आणि... महाराष्ट्रातील प्रवाशांची खास सोय; मध्य रेल्वेच्या 76 स्पेशल ट्रेन

नाताळ, नववर्ष आणि हिवाळ्याच्या सुट्टीमध्ये वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विविध मार्गावर 76 हिवाळी विशेष रेल्वेचालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेगाड्या मुंबई ते करमळी, नागपूर, मंगळुरू, तिरुवनंतपुरम्, तसेच पुणे ते नागपूर, अमरावती, सांगानेर दरम्यान चालविण्यात येणार आहेत. मुंबई-पुणे ते गोवा, केरळ, नागपूर, अमरावती आणि राजस्थानमधील सांगानेर येथे धावतील. यापैकी मुंबई-गोवा मार्गावर सर्वाधिक सेवा असतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी – करमळी – सीएसएमटी दरम्यान दैनिक विशेष ३६ रेल्वेगाड्या धावतील. गाडी क्रमांक सीएसएमटी ते करमळी विशेष रेल्वेगाडी १९ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत दररोज रात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी दुपारी १.१० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ करमळी ते सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी १९ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी २.१५ वाजता करमळी येथून सुटेल आणि सीएसएमटी येथे पुढील दिवशी रात्री ३.४५ वाजता पोहोचेल.एलटीटी – तिरुवनंतपुरम् – एलटीटी साप्ताहिक विशेष ८ रेल्वेगाड्या धावतील. गाडी क्रमांक ०११७१ एलटीटी ते तिरुवनंतपुरम् विशेष रेल्वेगाडी १८ डिसेंबर ते ८ जानेवारी या कालावधीत प्रत्येक गुरुवारी दुपारी ४ वाजता एलटीटी येथून सुटेल आणि तिरुवनंतपुरम् येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११७२ तिरुवनंतपुरम् ते एलटीटी विशेष रेल्वेगाडी २० डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत प्रत्येक शनिवारी दुपारी ४.२० वाजता तिरुवनंतपुरम् येथून सुटेल आणि एलटीटी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १ वाजता पोहोचेल.

टाइम्स स्पेशल

एलटीटी – मंगळुरू – एलटीटी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ८ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०११८५ एलटीटी ते मंगळुरू विशेष रेल्वेगाडी १६ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत प्रत्येक मंगळवारी दुपारी ४ वाजता एलटीटी येथून सुटेल आणि मंगळुरू येथे दुसऱ्या दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११८६ मंगळुरू ते एलटीटी विशेष रेल्वेगाडी १७ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत प्रत्येक बुधवारी दुपारी १ वाजता मंगळुरू येथून सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता पोहोचेल. सीएसएमटी – नागपूर – सीएसएमटी साप्ताहिक विशेष ६ रेल्वेगाड्या धावतील. गाडी क्रमांक ०१००५ सीएसएमटी – नागपूर विशेष रेल्वेगाडी २० डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत प्रत्येक शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१००६ नागपूर – सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी २० डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत प्रत्येक शनिवारी सायंकाळी ६.१० वाजता नागपूर येथून सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२५ वाजता पोहोचेल. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष ६ रेल्वेगाड्या, पुणे – सांगानेर – पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष ६ रेल्वेगाड्या आणि पुणे – अमरावती – पुणे साप्ताहिक विशेष ६ रेल्वेगाड्या धावतील. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण १० डिसेंबर रोजीपासून सुरू होईल. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर तिकीट काढता येईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg