loader
Breaking News
Breaking News
Foto

तरंदळे येथील धरणाच्या पाण्यात युवक व युवतीने आत्महत्या केल्याने खळबळ

कणकवली (प्रतिनिधी) - तरंदळे येथील धरणाच्या पाण्यात उडी घेऊन २२ वर्षीय युवक व १८ वर्षीय युवती यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी उत्तररात्री १.३० वा सुमारास उघडकीस आली. या दोघांनीही एवढे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप समजू शकले नाही. घडल्या प्रकारामुळे कणकवली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणारा मुलगा कलमठ गावातील तर मुलगी कणकवली शहरातील आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर मुलाचा मंगळवारी दुपारच्या सुमारास मोबाईल हरवला होता. हाच मोबाईल शोधण्यासाठी तो सायंकाळी ७ वा. सुमारास चुलत्याची दुचाकी घेऊन घराबाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान स्वतःचा मोबाईल नसल्याने या मुलाने आपल्या आईचा मोबाईल वापरला होता. याच मोबाईलवरून त्याने एका मुलीला व्हाट्सअप मेसेज केले असून ’आपण तरंदळे धरणावर जाऊया’ असे सुचवले होते. हे मेसेज मुलाच्या कुटुंबीयांच्या वाचनात आल्यानंतर त्यांनी रात्रीच्या सुमारास तरंदळे धरण गाठले. तेथे बॅटरीच्या सहाय्याने शोध घेतला असता धरणाच्या पाण्यामध्ये सदर युवक व युवती असे दोघांचे मृतदेह आढळून आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg