loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना कधीच संपणार नाही, संपर्क प्रमुख सुरेश कदमांना विश्वास

चिपळूण (ओंकार रेळेकर) - शिवसेना सोडून काही लांडगे, कोल्हे गेले त्यांच्यामुळे शिवसेनेवर काहीच फरक पडणार नाही. शिवसेना कधीच संपत नाही आणि संपणार देखील नाही लोकांची कामे करण्यासाठी शिवसेना संघटना आहे असे प्रतिपादन उबाठा शिवसेना चिपळूण संगमेश्वर संपर्क प्रमुख सुरेश कदम यांनी केले. सावर्डे येथील संपर्क कार्यालयात बुधवारी उबाठा शिवसेना चिपळूण संगमेश्वर संपर्क प्रमुख सुरेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदम बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख बळीराम गुजर, महिला उपजिल्हा संघटक धनश्री शिंदे, शहर प्रमुख भैया कदम, तालुका समन्वयक राजू देवळेकर, मुंबईचे माजी नगरसेवक बाबा जाधव, अशोक नलावडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज जे सरकार चालले आहे ते लोकशाहीच्या सूत्रानुसार चाललेलं नाही हे हुकूमशाही कडे चाललेल आहे. आज जर आपण सर्वांनी विचार नाही केला तर भविष्यामध्ये फार बेकार दिवस येतील. सगळीकडे पैशाचा बाजार चाललाय. माणसे खरेदी केली जातात. लोकांना धमक्या दिल्या जातात ही लोकशाही आहे का? यासाठी राज्य घटनेने दिलेल्या लोकशाहीनुसार चालण्यासाठी आपण सगळे एकत्र आले पाहिजे. आपण एकत्र येऊन शिवसेनेचे सरकार आणल्यास लोकशाही मार्ग तयार करणार आहोत असे सुरेश कदम म्हणाले. येणार्‍या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मी स्वतः सतर्क राहून कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे. पक्षप्रमुख देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी आपण सर्वजण राहूया. लोकांची कामे करण्यासाठी शिवसेना संघटना आहे. इच्छुक उमेदवारांनी वरून काय आदेश मिळतील याची वाट बघू नका. लोकांच्या संपर्कात जा लोकांच्या अडीअडचणी सोडवा घराघरात तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पोहोचा घरातील गावातील शहरातील समस्या जाणून घ्या हे जाणून घेतल्यानंतर आपल्याला संघटनेकडे मांडून कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी उपतालुकाप्रमुख संदीप राणे, राजा नारकर, अजित गुजर, सागर सावंत, तालुका प्रसिद्धी प्रमुख सचिन चोरगे, प्रसाद खेतले, पिंट्या पवार, रोशन जंगम, अनिल चव्हाण, महादेव खेतले, रवींद्र खेतले, वृषाली पाटणकर, पुनम चाळके, रेशमा चव्हाण, सोनाली चव्हाण, नंदिनी जड्याळ आणि शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईचे माजी नगरसेवक बाबा जाधव, बळीराम गुजर यांनी कदम यांना आपल्या भाषणात वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पक्ष संघटना वाढीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg